Breaking

शनिवार, १२ जून, २०२१

*सि.कुरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा देण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्णय - सरपंच शितल देशमुख*तीन एकर जागेची ग्रामपंचायत, ग्रामस्थांकडून मागणी


*सि.कुरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा देण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्णय - सरपंच शितल देशमुख*
तीन एकर जागेची ग्रामपंचायत, ग्रामस्थांकडून मागणी 

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

         खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरोली येथील सध्या मंजूर असलेले प्राथमिक उपकेंद्र व प्रस्तावित असलेले प्राथमिक केंद्राचे काम जागेअभावी रखडलेले असल्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या निदर्शनास आणुन देताच मी स्वःता लक्ष घालून जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द शिष्टमंडळाला दिल्याने सि. कुरोलीकरांच्या अनेक अडचणी यातून सुटणार आहेत अशी माहिती सरपंच सौ.शितल देशमुख यांनी दिली.   
         जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचा खटाव दौरा असल्याने त्यांना कुरोली उपकेंद्र व प्रस्तावित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची कैफियत त्यांच्या कानावर घातली. सि.कुरोली - रहिमतपूर रोड शेजारील ११ हेक्टर ८७ आर हि जमीन ग्रामपंचायत कुरोली यांच्या नियंत्रणात काही सरकारी अटीवर आहे. त्यामुळे त्या जागेचा निर्णय ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना करता येत नव्हता. हि बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. एकूण २८ एकर १२ आर जागेपैकी ३ एकर जागेची मागणी सि.कुरोली ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यातर्फे करण्यात आली.
         जिल्हाधिकारी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वता : लक्ष घालून जागा मिळवून देतो असा शब्द दिला आहे. यावेळी चर्चा करताना हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, राष्ट्रीय कॉग्रेस खटाव तालुकाध्यक्ष डॉ.विवेक देशमुख, वडूज बाजार समितीचे मा.सभापती अशोकराव गोडसे, संतोष भंडारे, डॉ.बाळासाहेब झेंडे, निलेश जाधव आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा