*तुळजापूर येथे लसीकरण मोहीम संदर्भात तुळजापूर नगरीचे कोरोना योद्धा नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांची पत्रकार परिषद*
तुळजापूर शहरातील विविध भागांमध्ये लसीकरण केल्यामुळे व त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे कोरूना संक्रमण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे, सदर लसीकरण मोहीम दिनांक 18 जून 2021 ते 25 जून 2021 या कालावधीमध्ये वय वर्षे 45 वरील लाभार्थ्यांना लशीचा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती, निर्धारित दिवशी खालील प्रमाणे लसीकरण देण्यात आले आहे, सदर दिवशी मोहीम यशस्वी करण्यासाठी सोबतच्या सूची प्रमाणे प्रभाग सदस्य व प्रभागातील अनुभवी लोकांनी सहकार्य केले, दिनांक 18 जून 2021 रोजी नगरपरिषद शाळा क्रमांक 3 तुळजापूर खुर्द येथे 108, दि,19 जून 2021 रोजी, मुख्याधिकारी निवासस्थान विश्वास नगर तुळजापूर येथे 106, दि, 20 जून 2021, रोजी जिजामाता नगर सभागृह तुळजापूर 117, दि, 21जून 2021, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तुळजापूर येथे 110, दि, 22 जून 2021 रोजी, नगरपरिषद शाळा 2, 99, दि, 23 जून 2021,रोजी झुंजार हनुमान मंदिर तुळजापूर 203, दि,24 जून 2021 रोजी सराया धर्मशाळा तुळजापूर येथे 70,तर दि, 25 जून 2021 रोजी लोहिया मंगल कार्यालय तुळजापूर येथे 158, झाले या लसीकरण मोहीमेत एकूण संख्या 971 व्यक्तींना लस देण्यात आली,लसीकरण यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे, उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ, चंचला बोडके, डॉक्टर श्रीधर जाधव, युवा नेते विनोद (पिटू) गंगणे, आनंद कंदले, तसेच तुळजापूर मधील सर्व नगरसेवक व नागरिकांनी सहकार्य केल्याने लसीकरण यशस्वीपणे पार पडले, असे नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा