*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर जाधव यांची निवड*
तामलवाडी :-दि.27 येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद क्रीडाशिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार, सिनेकलावंत ,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रभाकर जाधव यांची भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या अराजकीय सामाजिक संघटनेच्या शिक्षक व कर्मचारी सेल च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे. या निवडीचे नियुक्ती पत्र संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले,उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी यांच्यातील भ्रष्टाचार ,अन्याय ,अत्याचार विरोधी लढा देणारी राज्यव्यापी सामाजिक संघटना असल्याने अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्ह्यातील अन्यायग्रस्तांनी मोबाईल क्रमांक 94 21 87 65 48 या वर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे,
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा