Breaking

शनिवार, २४ जुलै, २०२१

शिवसेना तालुका प्रमुख मारहाण प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल




शिवसेना तालुका  प्रमुख मारहाण प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल

परंडा :-  तालुका प्रतिनिधी दत्ता नरुटे
शिवसेनेचे परंडा तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव यांना दि 20 रोजी मारहाण केल्या प्रकरणी 11जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे परंडा तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव शहरातील करमाळा रोडवरील पेट्रोलपंपाशेजारील एक हॉटेल मध्ये दि 20 रोजी चहा पित  होते याचवेळी अचानक युवराज ढोरे,विशाल गिलबिले,महावीर जगताप,योगेश वाघमोडे,राजा गायकवाड, रेवन ढोरे,हनुमंत ढोरे,बुद्धिवान ढोरे,सोन्या उर्फ अभिजित पाटील(सर्व रा शिराळा ता परंडा ) दत्ता मेहेर,प्रशांत गायकवाड( रा परंडा) हे सर्व जण संगनमत करून दुचाकीवरून आले व शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात  माजी आ ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो बॅनरवर का लावला   नाही म्हणून लाट्या काठ्या व धारदार शास्त्राने हातावर, पायावर,पोटावर, तोंडावर वार करून मारहाण केली यामध्ये अण्णासाहेब जाधव गंभीर जखमी झाले जाधव यांना उपजिहा रुग्णालयात  प्राथमिक उपचार करून बार्शी येथील रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले  याप्रकरणी अण्णासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिसात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो नि गिड्डे हे करत आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा