Breaking

बुधवार, १४ जुलै, २०२१

मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा सेवा संघ स्वस्थ बसणार नाही....मराठा सेवा संघ व 33 कक्षांची आढावा बैठक नांदेड येथे संपन्न



मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा सेवा संघ स्वस्थ बसणार नाही
---------------------------------------------------
मराठा सेवा संघ व 33 कक्षांची आढावा बैठक नांदेड येथे संपन्न
-------‐--------‐----------------------------------

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड. दि.11 नांदेड येथे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व 33 कक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक नुकतीच नवा मोंढा येथील यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वसतिगृह येथे संपन्न झाली. बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून  मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष इंजि.रामकिशन पवार, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री प्रा सुदर्शन तारख  शि म पं दे शि प राज्य सरचिटनीस शिवश्री व्यंकटराव जाधव ,केंद्रिय कार्यकारी सदस्य प्राचार्य डाॅ पंजाबराव चव्हाण माजी केंद्रिय कार्यकारी सदस्य इंजी शे रा पाटील जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा शिवमती सरस्वतीताई धोपटे,  यांच्या उपस्थितीत पार पडली... बैठकीचे प्रास्ताविक व मराठा सेवा संघ नांदेड जिल्ह्याचा आढावा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री उध्दवराव सुर्यवंशी व शिवश्री नानाराव कल्याणकर जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर यांनी मांडला. 
यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड सह सर्वच कक्षांनी आपला कार्य अहवाल व आढावा लिखित स्वरूपात प्रदेश कार्यकारिणी कडे सादर केला...

यावेळी बोलताना प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांनी सांगितले की मराठा आरक्षणा संदर्भात आम्ही गेल्या 25 वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संविधानिक चौकटीत टिकणारे आरक्षणा बाबत सक्षमपणे भूमिका मांडत आहोत ती म्हणजे मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करावा.
  मा.पुरुषोत्तम खेडेकर यांची सातत्याने ही भूमिका राहिलेली आहे. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळेपर्यत मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड स्वस्थ बसणार नाही यापुढेही सातत्याने खेडेकर साहेबांची भूमिका घेवून महाराष्ट्रभर काम करणार आहोत.
त्याच बरोबर सर्व कक्षात संघटनात्मक दृष्टया समन्वय असायला पाहिजे,गाव तिथं शाखा घर तिथं कार्यकर्ता ही संकल्पना अंगीकृत करून येणारया काळात जोमानं काम करावं लागणार आहे.आणि संभाजी ब्रिगेडला सर्व कक्षांनी सक्षम पाठींबा दिला पाहिजे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष करण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहीजे सर्व समाजाच्या व मानवाच्या उन्नती साठी सर्वानी प्रयत्न करून तीन वर्षे कालावधी झालेल्या कक्षाच्या कार्यकारण्या नव्याने निवड केल्या पाहिजेत असेही यावेळी प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांनी सांगितले..


यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रा.सुदर्शन तारख यांच्या उपस्थितीत ,मान्यवर व संभाजी ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवुन निवड करण्यात आली...

यात परमेश्वर पाटील,जिल्हा सचिव,मोहन शिंदे ,तालुकाध्यक्ष नांदेड उत्तर कमलेश कदम,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गजानन इंगोले,जिल्हा प्रचारक अनिल राठोड,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी देशमुख,शहर संघटक सारंग मिरासे,हिमायतनगर तालुकाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.

यावेळी,मराठा सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष रामकीशन पवार,संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रा.सुदर्शन तारख,प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.पंजाबराव चव्हाण, इंजि.शेरा पाटील पं.दे.शि.प.प्रदेश सचिव व्यंकटराव जाधव,डाॅ. सोपान क्षीरसागर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ सरस्वतीताई धोपटे, प्रदेश प्रवक्ता भारतीताई मढवई जिल्हाध्यक्ष उद्धवराव सूर्यवंशी, नानाराव कल्याणकर, प्रा रमेश पवार, सतिशकुमार जाधव इंजी संजय लोंढे ,प्रल्हाधराव दुरपडे पंडितराव कदम पडितराव पवळे,शिवाजी पाटील प्रा राधाकृष्ण होगे ,जे डी कदम,भाऊसाहेब नेटके,संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील भगवानराव कदम,शयाम पाटील सुभाष कोल्हे,बालाजी सिरसाट,प्रवीण जाधव, संगमेश्वर लांडगे अंकुश कोल्हे सचिन कदम जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा सौ विद्याताई पाटील, अरुणाताई जाधव वनिता देवसरकर यांच्या सह  मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व सर्व 33 कक्षासह जिल्ह्यातून आलेले सर्व तालुका अध्यक्ष  पदाधिकारी हे उपस्थित होते सुत्रसंचलन रमेश पवार यांनी केले आभार बालाजी सिरसाट यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा