बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून द्या-मारोती दिवसे पाटील
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट:- बोधडी (बु) तालुका किनवट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी निधी मिळणे संबंधी खा.हेमंत पाटील यांच्याकडे शिवसेना किनवट तालुका समन्वय मारोती दिवसे यांनी मागणी केली आहे.
बोधडी (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 25 वर्ष जुनी असून जीर्ण झाली असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळत आहे. त्यामुळे अंतर रुग्ण व बाह्य रुग्णांची गैरसोय होत आहे.बोधडी ही मोठी बाजार पेठ असल्यामुळे जवळच्या खेडे गावातील वाडी तांड्यातून लोकांची वर्दळ ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असते.त्यामुळे ही जुनी इमारत रुग्णसेवेसाठी कमी पडत आहे.गरजू रुग्णांना आरोग्याची सेवा चांगली मिळावी म्हणून आपण आपल्या अधिकारातून नूतन इमारत बांधकामास पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे शिवसेना किनवट तालुका समन्वयक मारोती दिवसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा