Breaking

रविवार, ११ जुलै, २०२१

टाकळी टें येथे कुराण शिकण्यासाठी आलेल्या मुलीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करून केला बलात्कार*

l
*टाकळी टें येथे कुराण शिकण्यासाठी आलेल्या मुलीचे  अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करून तरुणाने केला बलात्कार*

*टेंभुर्णी जवळ असलेल्या टाकळी येथील घटना/आरोपीस अटक*


 टेंभुर्णी : - कुराण शिकण्यासाठी माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथील नातेवाइकांकडे आलेल्या अल्पवयीन मुलीचे चोरून अंघोळ करताना काढलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन महिने जबरदस्तीने लैगिक अत्याचार केल्याचा गुन्हा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,पुणे जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथील तिच्या नातेवाइकांकडे मे २०२० मध्ये कुराण शिकण्यासाठी आली होती.काही दिवसानंतर त्या नातेवाईकांच्या मुलाने पीडित अल्पवयीन मुलीचे अंघोळ करताना चोरून फोटो काढले होते.ते फोटो इतर नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने जबरदस्तीने बलात्कार केला.यानंतर त्याने फोन महिने वारंवार बलात्कार केला.नंतर त्याच्या नातेवाईका बरोबर त्याने मुलगी अल्पवयीन असतानाही जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले.

लग्नानंतर नवरा त्या मुलीस पत्नी प्रमाणे वागवीत नव्हता.याचे कारण त्या मुलीने विचारले असता त्याने टाकळी येथील मुलांबरोबरचे संबंध बोलून दाखविले व त्या मुलीच्या आईस बोलावून घेऊन तिला तिच्या माहेरी पाठविले.यामुळे मुलीने त्या मुलास फोन लावून माझे वाटोळे का केले?अशी विचारणा केली.हे बोलणे मुलीच्या आईने ऐकले यानंतर दोघींनी मिळून भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्या सोबत घडलेली हकीकत सांगितली.तेव्हा ही घटना माढा तालुक्यातील असल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मुलीच्या तक्रारीवरून शाहरूख मुलाणी याच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि अमित शितोळे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा