Breaking

शनिवार, १० जुलै, २०२१

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार यांचे फलटण येथे स्वागत.


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार यांचे फलटण येथे स्वागत.


फलटण(प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार यांचे आज पायी वारी करताना फलटण शहरात आगमन झाले त्यांचे नगराध्यक्षांच्या हस्ते  स्वागत करण्यात आले
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा दोन तारखेला प्रस्थान निघून एकोणीस तारखेला पंढरपूरला नेहमीप्रमाणे जाणार आहे पण यावर्षी कोरोनामुळे पहिला मुक्काम देऊळवाडा(आळंदी) मध्ये म्हणजेच आळंदी मध्ये पार पडला त्याप्रमाणे 19 ता पर्यंत देऊळ वाड्यामध्ये ची पालखी राहणार आहे एकोणीस तारखेला पालखी देऊळ वाड्यातून प्रस्थान करून वाखरी(पंढरपूर) ला जाणार आहे परंतु बस मध्ये प्रवास असल्यामुळे आणि कोणतेही गावांमध्ये बस थांबवायची नाही असा नियम असल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे माऊलीचे पाय फक्त पंढरपूरला लागणार आहेत  माऊली नेहमीप्रमाणे फलटण वरून जाणार आहे परंतु माऊलीचा मुक्काम नसल्यामुळे या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार तसेच ह भ प नरहरी महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी प्रत्येक मुक्कामी एक किलोमीटर पायी वारी चालू ठेवण्याच्या अनुषंगाने आज फलटणमध्ये त्यांचे आगमन झाले होते त्यांचे आगमन म्हणजे प्रत्यक्ष माऊलीचे आगमन समजून प्रथेप्रमाणे फलटण नगरीचे नगराध्यक्षा निताताई नेवसे यांनी त्यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत केले यावेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट पंढरपूरच्या सदस्या माधवीताई निगडे, माजी नगरसेवक मिलिंद नेवसे, सुरज नेवसे ,विराज खराडे,सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख,ताजुद्दीन बागवान,युवराज शिंदे,मितेश खराडे,जीवन केंजळे,नसीर शिकलगार उपस्थित होते यावेळी उपस्थितांना राजाभाऊ चोपदार यांनी प्रसादाचे वाटप केले प्रथेप्रमाणे सोमवार दि 12 रोजी फलटण मध्ये पालखी सोहळा येत असतो मात्र कोरोनामुळे पायी सोहळा नसल्याने प्रतिकात्मक माऊलीची समाजआरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करणार असल्याचे विराज खराडे यांनी सांगितले
(फोटो संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार यांचे स्वागत करताना नगराध्यक्षा नीताताई नेवसे मिलिंद नेवसे)
(ग्रुप फोटो संत ज्ञानेश्वर महावराज पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार रामभाऊ चोपदार ह भ प नरहरी महाराज यांचे स्वागत प्रसंगी नगराध्यक्षा नीताताई नेवसे मिलिंद नेवसे ,विराज खराडे ,अमीरभाई शेख ताजुद्दीन बागवान ,युवराज शिंदे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा