*माळशिरस तालुका प्रहार शिक्षक संघटना कार्यकारिणी जाहीर..!*
माळशिरस तालुका प्रतिनिधी वैष्णवी थोरात
बच्चूभाऊ कडू* (शिक्षण राज्यमंत्री,महाराष्ट्र शासन) यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याध्यक्ष *महेशभाऊ ठाकरे* व सोलापूर जिल्हाध्यक्ष *हरिशदादा कडू* यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या प्रहार शिक्षक संघटनेची तालुका शाखा माळशिरसची कार्यकारिणी आज तालुका अध्यक्ष *अनिल जाधव* यांनी जाहीर केली..या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माळशिरस केंद्राचे केंद्रप्रमुख *श्रीरंग वाघमोडे* जिल्हा सरचिटणीस *अविनाश आगम* ,जिल्हा प्रवक्ता *प्रकाश काळे*,प्रहार जिल्हा नेते ,धनाजी वाघमोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य *नाना वारे*,आदर्श समितीचे नेते *नवनाथ माने* उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र मानाचा फेटा व गुलाबपुष्प देवून त्यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. तालुका कार्यकारिणी घोषित पदे सरचिटणीस प्रवीण गायकवाड शाळा जाधववस्ती, कार्याध्यक्ष विष्णु जायभाय शाळा माळखांबी , कोषाध्यक्ष प्रदीप राजगुरु शाळा भांब, उपाध्यक्ष पांडुरंग माने शाळा मुले नं 2 माळशिरस, प्रसिद्धि प्रमुख अनूप जाधवर शाळा कदमवस्ती, संपर्क प्रमुख लक्ष्मण भिंगे मानेवाडी धर्मपुरी, संघटक सतीश लोखंडे शाळा दबासेवस्ती चांदापुरी, कार्यकारिणी सदस्य निसार पठाण शाळा भांब,अशी कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
प्रास्ताविक करताना *अविनाश आगम* यांनी प्रहार शिक्षक संघटनेची भुमिका स्पष्ट करताना म्हटले की जेथे जेथे सामान्य शिक्षकावर अन्याय होईल तेथे तेथे प्रहार शिक्षक संघटना प्रहार करून न्याय मिळवून देईल. निवड झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यांनंतर निवड झालेल्या पदाधिकारी *विष्णू जायभाय, प्रविण गायकवाड, पांडुरंग माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीरंग वाघमोडे सर* यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना प्रहार च्या माध्यमातून आपले भावी काम अतिशय उत्कृष्ट होईल अशी खात्री व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ते *प्रकाश काळे* यांनी केले तर आभार नूतन सरचिटणीस *प्रवीण गायकवाड* यांनी मानले.
नवनियुक्त कार्यकारिणीस शुभेच्छा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून जेष्ठ शिक्षक अशोक पाटील, ज्ञानेश्वर कोष्टी, विनोद खाडे, रामचंद्र बुरकुले, दत्तात्रय लोखंडे, दत्तात्रय कांबळे, संतोष पवार, कैलास सोनवणे, हनुमंत गायकवाड, अमोल चव्हाण, पृथ्वी गुट्टे, विवेक रणवरे, सर्फराज शेख, जावेद मुलाणी, सत्यजीत बनकर, अमित भोसले, विनायक कांबळे, सुहास रसाळ, सोमनाथ झेंडे, हनुमंत तेलसंग आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा