महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा, उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील इंदिरा नगर येथे युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन युवासेना तालुका प्रमुख प्रतिक बप्पा रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेनेच्या शहरसंघटक पदी खंडु माने,उपशहरप्रमुख पदी ओंकार कलशेट्टी, चंदर सगरे,शहर सचिव पदी सोमनाथ खद्दे,शाखाप्रमुख पदी विश्वजित कांबळे, उपशाखाप्रमुख पदी नागेश कासार यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोषजी पुदाले, उपशहरप्रमुख शाम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे, ग्राहक कक्षप्रमुख नेताजी महाबोले, भिमा कोळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा