वडूज येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित महिला संघटिका राणी काळे यांच्या वतीने फळे वाटप.
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त खटाव तालुका महिला आघाडीच्या संघटिका राणी विकास काळे व शिवसेना पदाधिकारी यांच्यावतीने वडूज नगरीत फळांचे वाटप करण्यात आले .या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील, उप तालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव, महेश गोडसे शहर उपप्रमुख किशोर गोडसे, विभाग प्रमुख संतोष दुबळे व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॊरोना व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे कोणतीही जाहिरात बाजी न करता सर्व सामान्य लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून शंभर डझन केळी व फळे वाटप करून अनेकांना दिलासा दिला. वडूज येथील अभिषेक फूट वेअर, कराड-दहिवडी रस्त्यावर आज दुपारी सामाजिक अंतर राखून शिस्तबद्ध पद्धतीने फळे वाटप केले. या वेळी पेडगाव, बनपुरी, नढवळ, कातरखटाव, कुरोली, पेडगाव, खटाव, सातेवाडी, हिंगणे, तडवळे, बोबाळे, कुमठे, अंबवडे, मांडवे, एनकुळ, नायकाचीवाडी, येरळवाडी व परिसरातील शिवसैनिक नितीन बर्गे, अभिषेक काळे, मयूर पाटील, योगेश तिवाटणे, मधुकर काळे, चैतन्य बर्गे, कल्पेश काळे, वंदना काळे, शोभा घुले व महिलावर्ग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांना चांगले कार्य करण्यास शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा