*काक्रंबावाडी येथे लहान मुलांनी केली शाळेची स्वच्छता आणि दिला स्वच्छतेचा मोलाचा संदेश......*
तुळजापूर- आज दि. 25 जुलै 2021 रोजी काक्रंबावाडी येथील कोळेकर महेश बजरंग मित्रपरिवार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली गावातील जि. प. प्रा.शाळा कोळेकरवाडी येथील शाळेची स्वच्छता करण्यात आली.
लहान वयापासूनच स्वच्छतेचा ध्यास मनी जोपासता यावा स्वच्छतेचे महत्व त्यांना समजावे शिक्षणा विषयी त्यांच्या मनात आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कोरोना मुळे ओस पडलेल्या शाळा आणि शाळेत झालेली घाण, कचरा, वाढलेली झाडेझुडपे ही सर्व या स्वच्छतेच्या माध्यमातून काढून टाकण्यात आली. या उपक्रमातून आज हेच स्पष्ट होते की नुसते फोटो पुरते हातात झाडू न्हवते तर देशसेवेबद्दल प्रत्येक लहान मुलाच्या मनात प्रेम होते. आज या लहान मुलांच्या मनात असणारी समाज देश सेवेबद्दल ची तळमळ पाहून गावातील विविध स्तरातून या लहान मुलांच आणि कोळेकर महेश मित्रपरिवार यांचे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा