![]() |
रोटरी क्लब टेंभुर्णी येथे पदग्रहण सोहळ्यात पदभार स्वीकारताना नूतन अध्यक्ष नागेश कल्याणी व सचिव सुजित बेलपत्रे |
रोटरी क्लब टेंभुर्णी चा पद्ग्रहण समारंभ संपन्न
टेंभुर्णी(प्रतिनिधी)
माणसाने बाह्य गोष्टी पेक्षा अंतरंगा कडे जास्त लक्ष दिले पाहिजे. गोष्टी जिथे पाहिजेत तेथे असतील तर तर जीवन नक्की सुकर होईल. माणसे रस्त्याच्यामधून चालतात तर फुटपाथ वरुन गाड्या चालवतात. हिच गल्लत आपण जीवन जगत असताना ही करतो. स्वतःच आपल्या दुःखाचे कारण बनत असतो , त्यामुळे आपण दुसर्या कडे दुसर्या च्या जीवनात न डोकावता स्वतःच्याच अंतरंगात सकारात्मक बदल करावेत असे प्रतिपादन अमित जाधव यांनी रोटरी क्लब, टेंभुर्णीच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. करोना साथीच्या च्या पार्श्वभूमीवर हा समारंभ सार्वजनिक रीतीने न होता ,क्लब मध्येच सभासदाच्या व काही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मध्ये पार पडला.कार्यक्रमाची सुरवात विश्वतेज बोबडे यांच्या गणेश गीता ने झाली. टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे ,भाजपा चे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, राष्ट्रवादी युवक चे माजी तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, ग्रा प सदस्य भाऊसाहेब महाडिक, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश बोबडे, परमेश्वर देशमुख, ग्रा प सदस्य हरिभाऊ सटाले, अँड.संतोष कानडे, संतोष ताबे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी
मावळते उपाध्यक्ष प्रदीपकुमार माढा, सचिव उमेश रावळ यांचे कडून नूतन अध्यक्ष नागेश कल्याणी सचिव सुजित बेलपत्रे यांनी घेतला पदभार घेतला. यावेळी क्लब ला पुढील वर्षे साठी करवायच्या कामा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रोटरी जिल्हा 3232 पिंपरी टाऊन चे माजी अध्यक्ष अनिल नेवाळे व सन 2021-22 चे रोटरी जिल्हा 3132 उपप्रांतपाल डॉ. हर्षद शहा (कुर्डूवाडी) हे आवर्जुन उपस्थित होते.या वेळी नूतन अध्यक्ष नागेश कल्याणी यांनी बोलताना क्लब च्या आजवरच्या कामा बरोबरच आता क्लब आता आपल्या पारंपरिक समाजकार्या बरोबरच आता मोठे आरोग्य विषयक काम करणार आहे. टेंभुर्णी व परिसराला अधिक गरज आहे. असे सांगितले.तसेच या साठी रोटरी इंटरनॅशनल च्या ग्लोबल ग्रॅड मधून ही मदत मिळविता येईल त्या साठी टेंभुर्णी क्लब सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असलेल्याचे सांगितले. वेळी डॉ. हर्षद शहा यांनी ही प्रथे प्रमाणे प्रांतपाल ओम मोतीपावले यांचा शुभेच्छा संदेश रोटरी क्लब,टेंभुर्णी ला दिला व रोटरी क्लब,टेंभुर्णी ला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मावळते सचिव उमेश रावळ यांनी गत वर्षी च्या कार्याचा चा आढावा सांगितला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे माजी सचिव सचिन होदाडे व संदीप मोकाशी यांनी केले. नूतन सचिव सुजित बेलपत्रे यांनी सर्वांचे आभार मानले या वेळी रोटरी कार्यक्रमाला माजी अध्यक्ष रमेश पाटील, नागेश बोबडे, विनोद शिंदे, अनिल बाबर, अनिल मस्के,रणजित बोत्रे , डॉ पांडुरंग गायकवाड, प्रशांत गांधी, वैभव गांधी यशवंत हांडे, तसेच सदस्य बाळासाहेब सापाटे,संतोष तांबडे,संदीप जाधव, किशोर सलगर,महेश कोठारी, पारस कटारिया, श्रीकांत लोंढे, संदीप मोकाशी ,संदीप मांजरे, दीपक व्यवहारे, महेश कोकीळ, पपेश पाटील,डॉ.मदन कांबळे आदी रोटरी क्लबचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा