Breaking

बुधवार, ७ जुलै, २०२१

प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप....ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटर मधील महीला रुग्णांना साड्यांचे वाटप....



प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप....

ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त  कोविड सेंटर मधील महीला रुग्णांना साड्यांचे वाटप....

श्रीगोंदे :-नितीन रोही

श्रीगोंदे शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे सस्थापक ,अध्यक्ष  ना.बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निम्मंत श्रीगोंदे तालुका  प्रहार संघटनेचे वतीने तालुका प्रमूख सुरेश सुपेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप तसेच ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर मधील महिला रुग्णांना साड्या वाटप करण्यात आले .        राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री  नामदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथे प्रहार संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष सुरेश सुपेकर  व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात व कोविड सेंटर मध्ये  असणाऱ्या रुग्णांना फळे ,बिस्किटे वाटप करण्यात आले तर  महीला रुग्णांना साड्या वाटप करण्यात आले , या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितिन खामकर व डॉ. संघर्ष राजुळे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. तसेच प्रहार संघटनेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा