Breaking

मंगळवार, ६ जुलै, २०२१

छावा चे नानासाहेब जावळे यांनी केले सिरसाट कुटूंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत...मयत दिव्यांग शेतकरी भीमराव सिरसाट यांच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे- नानासाहेब जावळे


छावा चे नानासाहेब जावळे यांनी केले सिरसाट कुटूंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत...

मयत दिव्यांग शेतकरी भीमराव सिरसाट यांच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे- नानासाहेब जावळे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

दि.3-जुलै रोजी लोहा तहसील येथे दिव्यांग शेतकरी भीमराव चंपती सिरसाट यांनी कर्जाचे ओझे अन प्रशासनाच्या अनास्थेला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.

ही बातमी समजताच अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील यांनी उमरा येथील सिरसाट कुटूंबियांची सांत्वन पर भेट घेतली व आर्थिक मदत देखील केली.प्रशासनाच्या दिरंगाई मुळे एका निष्पाप दिव्यांग शेतकऱ्यांची आत्महत्या ही खूपच वाईट घटना आहे.आणि यात जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.मी आणि माझी पूर्ण संघटना यासाठी सिरसाट कुटुंबासोबत असल्याचे नानासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले.

यावेळी छावाचे भीमराव मराठे,प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे,विजयकुमार घाडगे,परमेश्वर जाधव,प्रताप कदम खंडू सावळे, मोहनराव सिरसाट, सचिन सिरसाट, नागोराव सिरसाट ब्रम्हानंद सिरसाट,संतोष जाधव,पंजाब सिरसाट,बालाजी सिरसाट, श्रीनिवास सिरसाट आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा