राष्ट्रवादी पक्षाने दिले केंद्र सरकार विरोधात तहसिलदारांना निवेदन
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
केंद्र शासनाच्या भरमसाठ इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महागाई दरवाढ व घरगुती गँस तसेच पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. सातत्याने होणार्या दरवाढीने येथील जनता मेटाकुटीला आली असून केंद्र सरकारने ही अवाजवी दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अश्या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. खटावच्या सभापती जयश्रीताई कदम, माजी सभापती संदीप मांडवे, जि.प.सदस्य सुरेंद्रदादा गुदगे, नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे, माजी जि प सदस्य प्रा.एन एस उर्फ बंडा गोडसे, जितेंद्रदादा पवार, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जूनराव खाडे, बाजार समितीचे माजी सभापती विजय काळे, माजी उपसभापती एस पी देशमुख, शशीकलाताई देशमुख, सचिन माळी, संदीप गोडसे, आप्पासाहेब गोडसे, बाळासाहेब पोळ , सुहास पिसाळ, ज्ञानेश्वर शिंदे, शैलेश वाघमारे, आदिसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान सातेवाडी येथील मधुमाला सांस्कृतिक भवनात जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची हि बैठक माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या बैठकीस खटावच्या सभापती जयश्रीताई कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, प्रकाश पाटोळे, हणमंत कोळेकर, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र कुंभार , संदीप गोडसे, अक्षय थोरवे आदींसह खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, गावोगावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवर मंडळीने मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बंडा गोडसेसर यांनी केले, सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी तर आभार विजय काळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा