Breaking

बुधवार, २१ जुलै, २०२१

शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम* *भैय्या पवार यांच्या वाढदिवसानिमित्त* *इंदापूर* शहरात_* *विविध सामाजिक उपक्रम*

 




*शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम* *भैय्या पवार यांच्या वाढदिवसानिमित्त* *इंदापूर* शहरात_* *विविध  सामाजिक उपक्रम*

प्रतिनिधी रेडा
 *शशिकांत सोनटक्के*

नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक कमात अग्रेसर असणारे शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम भैय्या पवार यांच्या वाढदिवस बुधवारी (दि.२१) विविध सामाजिक उपक्रम विधायक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे.

त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी
रेडा गावचे युवा सामजिक कार्यकर्ते पै. पांडू (बाबा )मोहिते व भिम शक्ती संघटना अध्यक्ष राहुल बोबडे महाराज आणि कार्यकर्ते उपस्थित होते,
इंदापूर येथील नेताजीनगर (४०फुटी रोड) येथे सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,
त्याच बरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबिर,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ,अनाथालयास धान्य वाटप वॄध्दांसाठी आधार काठीचे वाटप तसेच गरजू महिलांना साडी वाटप     



असे विविध सामाजिक उपक्रम सकाळ पासूनच राबविण्यात येत असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे,
इंदापूर शहरातील उभरते युवा नेतृत्व शुभम भैय्या पवार यांनी इंदापूर शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांना सामाजिक बांधिलकी या नात्याने मदतीसाठी धावून येत मदत केलेली आहे, शहरात महापुरुषांची जयंती असेल किंवा विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम असो प्रत्येक वेळी येणाऱ्या दिवसात या युवा नेतृत्वाला शहरातील नागरिकांची सेवा करण्यास संधी नक्कीच मिळेल यात मात्र शंकाच नाही असे मत नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा