Breaking

गुरुवार, २२ जुलै, २०२१

परंडा येथील संगम पार्कच्या रस्त्याची दयनीय अवस्था पावसाळ्यामध्ये संगम पार्क वासीययांना ये जा करण्यासाठी रस्ताच नाही.*

*परंडा येथील संगम पार्कच्या रस्त्याची दयनीय अवस्था पावसाळ्यामध्ये संगम पार्क वासीययांना ये जा करण्यासाठी रस्ताच नाही.*


 परांडा . दिनांक 21 जुलै 21
परंडा शहरातील बावची रोड कडे असलेल्या संगम पार्क मध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे संगम पार्क मध्ये राहत असलेल्या लोकांना ये-जा करण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात . परंडा शहरातील संगम पार्क पहिले नगर आहे . परंडा शहराचा विकास पाहता गेल्या अनेक वर्षापासून संगम पार्क रस्त्यापासून उंचीत आहे.  साधी सायकल सुद्धा संगम पार्क मध्ये जाऊ शकत नाही अशी अवस्था रस्त्याची आहे . संगम पार्कमध्ये अनेक नोकरवर्ग राहत आहे ,अनेक नोकरदार अनेक कामगार या ठिकाणी राहतात त्यांना पावसाळ्यामध्ये अतोनात हाल  सोसावे लागतात .अनेक वेळा नगर परिषदेकडे पाठपुरावा केला असता नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये संगम पार्क येत नाही केवळ असेच उत्तर मिळते. तेव्हा कोणीतरी पुढाकार घेऊन संगम पार्कसाठी रस्ता तयार करावा अशी मागणी संगम पार्क मध्ये राहणाऱ्या लोकांकडून होत आहे. बावची रोड पासून संगम पार्क हे केवळ काही फुटांवरच वसलेले नगर आहे परंतु एवढ्या अंतरावर सुद्धा एखादी गाडी सुद्धा जाऊ शकत नाही अशी अवस्था या पार्कची आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे परंडा उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा