Breaking

बुधवार, २१ जुलै, २०२१

काक्रंबावाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि तुळजाई फिल्म्स च्या वतीने करण्यात आला काक्रंबावाडी येथील सर्वोत्कृष्ट युवा कलाकार श्री. गणेश सुरेश कोकरे यांचा गुणगौरव.....*


*काक्रंबावाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि तुळजाई फिल्म्स च्या वतीने करण्यात आला काक्रंबावाडी येथील सर्वोत्कृष्ट युवा कलाकार श्री. गणेश सुरेश कोकरे यांचा गुणगौरव.....*

  काक्रंबावाडी येथील श्री. गणेश सुरेश कोकरे यांचा काक्रंबावाडी गावातील सर्वोत्कृष्ट युवा कलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 
       श्री. गणेश सुरेश कोकरे यांनी आपल्या अभिनयाच्या कलेवर संपूर्ण कलाप्रेमी मंडळींवर छाप टाकली आहे. गावातील विविध सांस्कृतिक कार्यात आपली कला त्यांनी दाखवली आहे. त्यांनी नेतेगिरी, चिकन्या, तसेच अण्णासाहेब शिवाजी कोळेकर दिग्दर्शीत केलेल्या नवा पायंडा अशा अनेक लघुपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी अभिनयातून समाजप्रबोधन करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आहेत. प्रत्येक लघुपट मध्ये त्यांनी वेगवेगळी भूमिका केलेली आहे. त्यांनी आपल्या हास्य कलेच्या जोरावर लोकांच्या मनावर छाप टाकली आहे.
        यावेळी उपस्थित काक्रंबावाडी गावचे ग्रामस्थ तसेच तुळजाई फिल्म्स चे निर्माते श्री. अमोल भिवाजी कोळेकर, दिग्दर्शक- महेश बजरंग कोळेकर आणि सर्व कलाकार आणि युवक वर्ग उपस्थित होते. 
आज श्री. गणेश सुरेश कोकरे यांच्या सर्वोत्कृष्ट युवा कलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा