राजुर येथील तळीराम पोलीस कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्याची. व्यापाऱ्यांची जिल्हा पोलीस प्रमुख काकडे. मागणी .
जालना प्रतिनिधी मनिषा मगरे
येथील हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत पोलिस चौकी राजूर येथील पोलीस कर्मचारी संतोष वाढेकर हे दारूच्या नशेत येऊन व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांना दमदाटी करून शिवीगाळ करतात .व पैशाची मागणी करतात .सदरील कर्मचाऱ्याची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी व्यापार्यांनी एका निवेदनाद्वारे मा. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे केली आहे .
काही दिवसांपूर्वी येथील चौकात माऊली हॉटेल असून .येथे सदरील कर्मचारी येऊन हॉटेल मालक सुनील पुंगळे यांनी हॉटेल बंद केले होते .तरीसुद्धा तुला हॉटेल चालवायचे असल्यास मला पाच हजार रुपये महिन्याला दे अशी मागणी केली .पूंगळे हे समजून सांगितले असता वाढेकर यांनी शिवीगाळ करून धमकी दिली .असे गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे असे निवेदन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे दिले . एकीकडे राजूर सह परिसरात अवैध धंदे बिनबोभाट चालू असून सदरील पोलीस कर्मचारी जाणून बुजून हॉटेल व्यावसायिक व छोटे व्यावसायिक यांना मानसिक त्रास देत आहे .काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून नागरिक ,व्यापारी ,व सर्वसामान्य जनतेस त्रास देणाऱ्या या कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असून निवेदनावर सुनील पुंगळे. यांच्यासह प्रमोद कांबळे, विनोद पुंगळे,ज्ञानेश्वर नागवे ,उमेश पुंगळे,कृष्णा जाधव ,शिवाजी ढगे,राजू जाधव, प्रभू कढवणे,अर्जुन पुंगळे, योगेश कापसे , संदीप पुंगळे, कैलास ढगे,निवृत्ती टॉम्पे ,अमोल पवार , गणेश गायके ,जनार्दन ढवळे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा