Breaking

मंगळवार, १३ जुलै, २०२१

टेंभुर्णी येथे शिव संपर्क अभियानास सुरुवात


टेंभुर्णी येथे शिव संपर्क अभियानास सुरुवात

टेंभुर्णी प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान राबवले जात आहे. 

आज माढा तालुका शिवसेनेच्या वतीने टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालय याठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे व माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टेंभुर्णी व बेंबळे जी.प. गटातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिव संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुका उपप्रमुख संतोष ढवळे,टेंभुर्णी विभाग प्रमुख बाबा चंदनकर,बेंबळे विभाग प्रमुख सोमनाथ लांडे,टेंभुर्णी शहर प्रमुख सुरेश भाऊ लोंढे,रुई चे सरपंच कल्याण वाघमारे,सरपंच अनिल भानवसे,टेंभुर्णी शहर उपप्रमुख संतोष खैरमोडे,आनंद पाटील,पत्रकार सोपान ढगे,टेंभुर्णी शहर युवा अधिकारी कुलदीप पाटील,अमोल धुमाळ,जयवंत कोळपे,प्रशांत सोनवणे,विठ्ठल कोळपे,समाधान काका देशमुख,किशोर नाळे,निलेश मुसळे,जॉकी सुर्वे,सुरज जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा