तुळजापूरात आण्णाभाऊ साठे पुतळा उभारण्यास दिरंगाई का ? राष्ट्रवादीचे दत्ता कांबळे
तुळजापूर शहरात नियोजित ठिकाणी आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कामाची सुरुवात करा. ह्या विषयी राष्ट्रवादी पक्षाचे तुळजापूर विधानसभा विभाग मागासवर्गीय सेलअध्यक्ष दत्ताभाऊ
कांबळे यांचे मार्गदर्शन खाली (दि.२८)रोजी सर्किट हाऊस येथे मातंग समाज प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली.नगर परिषद कडून अनेक दिवसापूर्वी उस्मानाबाद रोड लगत जागा उपलब्ध झाली आहे.मात्र प्रत्तक्षात पुतळा उभा करण्याची प्रक्रिया ठप्प
आहे.
वर्षोनुवर्षे जैसेथे वस्तुस्थिती पाहावयास मिळत आहे.ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आनून देण्यासाठी दत्ताभाऊ कांबळे हे नगर परिषद, जिल्हाधिकारी व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेकडे पाटपुरावा करणार असल्याचे बैठकीत म्हणाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण कांबळे यानी केले.या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष किरण भाऊ कांबळे,
पत्रकार संजय गायकवाड,राष्ट्रवादी
सामाजिक न्याय विभाग शहर उपाध्यक्ष
बालाजी भाऊ कांबळे,विकास हजारे,
संदीप सिरसट,शंकर गायकवाड,
राजकुमार कांबळे,राम क्षीरसागर,
सुरज डोलारे,नागेश लोंढे,बाबू शिंदे,
गोरख शिंदे व इतर उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा