Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

शिक्षण सभापती जि. प. सातारा मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते 'घरोघरी शाळा' उपक्रमाचे उदघाटन.


शिक्षण सभापती जि. प. सातारा मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते 'घरोघरी शाळा' उपक्रमाचे उदघाटन. 
 


            कचरेवाडी ता. कराड येथील विद्यार्थ्यांना आता घरीच मिळणार शिक्षण. 

ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करून शिक्षणाची ज्ञानगंगा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी ता.कराड जि.सातारा येथील उपक्रमशील शिक्षिक श्री.शंकर रामुगडे  यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या 'घरोघरी शाळा' या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मा.मानसिंगराव जगदाळे साहेब सभापती शिक्षण व अर्थ समिती जि.प.सातारा यांच्या शुभहस्ते तसेच मा.रमेश चव्हाण साहेब पं. स. सदस्य कराड , मा.सौ.शालन माळी मॅडम पं. स. सदस्या कराड , मा.सौ. शबनम मुजावर मॅडम गटशिक्षणाधिकारी पं. स. कराड, मा. आनंद पळसे साहेब गटशिक्षणाधिकारी महाबळेश्वर तथा शिक्षण विस्तार अधिकारी बीट मसूर, मा.सौ.नसिमा संदे मॅडम केंद्रप्रमुख हेळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. 
माण तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वडगावचे मुख्याध्यापक मा. श्री.संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा हा उपक्रम श्री. शंकर रामुगडे सर यांनी कचरेवाडी मध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून  प्रत्येक विद्यार्थ्याला  शैक्षणिक साहित्याचा संच मोफत देवून नियमित गृहभेटीद्वारे शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवण्याचे कार्य हाती घेतले आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात तयार केलेल्या स्वतंत्र शाळांपैकी                 कु.जान्हवी महादेव शिंदे व  पायल महादेव शिंदे यांच्या घरी पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी कचरेवाडी गावचे सरपंच मा. श्री. सचिन माने कचरेवाडी शाळेच्या शाळा व्यव.समिती अध्यक्षा मा. सौ. वर्षा ढेरे मॅडम तसेच मसूर बीटातील इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांचीही  उपस्थिती होती. त्यासाठी विद्यार्थिनीच्या घरासमोर फुग्यांची आकर्षक कमान केली होती. दारासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. 
           याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना उपक्रमाचे खूप कौतुक केले. कोरोना संकटकाळात 100% विद्यार्थ्याचे  शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवणारा सदरचा उपक्रम यशस्वीपणे राबवून महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना सदरचा उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन करणारे माण तालुक्यातील वडगावचे मुख्याध्यापक मा. संजय खरात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम कचरेवाडी येथे सुरू करणारे मा.श्री.शंकर रामुगडे सर यांना सदर उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
       सदर कार्यक्रमास शाळा व्यव. समिती कचरेवाडी उपाध्यक्ष मा. दत्तात्रय भानुदास सुर्वे तसेच सदस्य मा. राजेंद्र शंकर माने तसेच गावातील सर्व तरुण मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा