Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

सख्या भावाच्या खुन प्रकरणात दिलेली जन्मठेपे ची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द.



सख्या भावाच्या खुन प्रकरणात दिलेली जन्मठेपे ची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द.




टेंभुर्णी प्रतिनिधी :-अशोक श्रीपत चव्हाण यांने त्याच्या भावावर त्याच्या बायकोशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन गळा दाबून खून केलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय यांनी गुन्हा सिद्ध झाल्याप्रकरणी आरोपीस सन २०१० मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरोधात आरोपी यांनी माननीय उच्च न्यायालय येथे अपील दाखल केले होते. सदर प्रकरणात उच्च न्यायालय यांनी आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ऐकून सदर प्रकरणात दिलेली शिक्षा कलम ३०० नुसार योग्य नसून सदर गुन्हा सदोष मनुष्यवधाचा होत नसल्याचा निकाल दिला. आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना सदर गुन्हा अचानक घडलेला असून कोणतीही पूर्व तयारी तसेच वाईट हेतूने केलेला नसल्याने देण्यात आलेली शिक्षा चुकीची असल्याचा युक्तिवाद केला. सदर गुन्हा हा कलम ३०० अपवाद ४  मध्ये बसत असल्याने कलम ३०० नुसार दिलेली सदोष मनुष्यवधा ची शिक्षा चुकीची आहे असा युक्तिवाद करण्यात आला. फिर्यादी पक्ष यांना सदर गुन्हा हा अशोक चव्हाण यांनी पूर्वतयारीने अथवा वाईट प्रेरणेने केल्याचे सिद्ध केले नाही. याउलट सदर गुन्हा अचानक झालेल्या भांडणातून घडलेला असल्यामुळे आरोपीच्या वतीने करण्यात आलेले युक्तिवाद मान्य करून सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्या नुसार शिक्षा देता येणार नाही असा निष्कर्ष उच्च न्यायालय यांनी काढला. सदर गुन्हा सदोष मनुष्यवधाचा नसल्याने जिल्हा न्यायालय यांनी दिलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून दहा वर्षाची शिक्षा देण्यात आली, परंतु सदर शिक्षा आरोपी अशोक यांनी जिल्हा न्यायालयाच्या दिलेल्या निकाला पासून ते आज पर्यंत भोगलेली असल्याने आरोपीस तुरुंगातून लगेच मुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय यांनी दिले. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. रुपेश बोबडे यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षा तर्फे ॲड. पीपी शिंदे यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा