जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या पाच तालुक्यातील गावांना ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण करण्यास परवानगी
............ जिल्हाधिकार्यांचा नवीन आदेश
बेंबळे। प्रतिनिधी।
वृत्तांत असा की सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या पाच तालुक्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव मागील एक आठवड्यापासून वाढत असल्यामुळे या तालुक्यातील कोणत्याही गावात ग्रामपंचायत अथवा कुठल्याही शासकीय कार्यालय किंवा शाळा कॉलेजेस या ठिकाणी, पंधरा ऑगस्ट रोजी असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यास परवानगी नाकारण्यात आलेली होती व तसा स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी सर्वांना पाठवला होता. परंतु आता यामध्ये बदल करून व या बाबतीत सर्व बाबींचा विचार करून, संबंधित पाच तालुक्यातील प्रत्येक गावातील फक्त ग्रामपंचायतीमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या नियमांचे काटेकोर पालन करून सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक व शिपाई यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी ध्वजारोहण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे व तसा आदेश सर्वत्र पारित केला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा