Breaking

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

तुळजापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांना ए,आय,टी,संस्थेचा उच्च पुरस्कार प्रदान*



*तुळजापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांना ए,आय,टी,संस्थेचा उच्च पुरस्कार प्रदान*


तुळजापूर येथे ए.आय.टी. संस्थे अंतर्गत पार पडलेल्या स्वप्नपंख या भव्य समारंभात गतवर्षी उच्च गुणांनी तसेच आपल्या वेगवेगळ्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली,वर्षभरात कोरोना महामारीच्या काळात वेगवेगळ्या संकटाला तोंड देऊन ए.आय.टी चा वर्षाचा सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार कुमारी.अक्षता नागनाथ सुरवसे,व कुमार.श्रीकृष्ण चंद्रसेन जगताप,यांना तालुक्याचे तहसीलदार श्री.सौदागर तांदळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, व तसेच उत्कृष्ट सर्जनशील विध्यार्थी पुरस्कार कुमारी.गौरी अनिल अपतूरकर, यांना तुळजापूर नगरी चे नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी यांच्या हस्ते देण्यात आला, तर उत्कृष्ट विध्यार्थी प्रतिनिधी प्रमुख पुरस्कार कुमार,योगीराज राहुल मस्के, यांना यशवंतराव चव्हाण महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.अनिल रामचंद्र शित्रे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, याप्रसंगी ए.आय.टी. संस्थेचे संचालक प्राध्यापक,अतिष घाटशिळे व सर्व संचालक मंडळ आणि इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा