Breaking

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

तुळजा भवानी मंदीर संस्थान तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्र्ट शासनास हस्तांतरीत करावे*




*तुळजा भवानी मंदीर संस्थान  तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालय  महाराष्र्ट शासनास हस्तांतरीत करावे*

मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्हातील गरीब व हौतकरु विद्यार्थांचे शासकीय शुल्का मध्ये तांत्रिक शिक्षणाची सोय होऊन या भागाचा शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा या अनुशंगाने सदरील महाविद्यालय शासनाने अधिग्रहित करावे यासाठीचा प्रस्ताव शासना कडे सादर करण्यात आला आहे श्री तुळजा भवानी महाविद्यालय हे तुळजा भवानी मंदीर संस्थानचा शैक्षणीक उपक्रम असल्याने अशा प्रकारच्या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालया कडे विद्यार्थांचा कल कमी झाला असुन कर्मचार्‍यांचे मासिक वेतन देखील प्रलंबीत रहात आहे त्यामुळे सदरील महाविद्यालय शासनास हस्तांतरीत करावे म्हणुन माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री उदय सामंत यांना निवेदन दिले. या वेळी रुग्न कल्याण समीती सदस्य आनंद कंदले उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा