औटेवाडीच्या महिलांनी नागपंचमी सणानिमित्त केले-वृक्षारोपण.....
श्रीगोंदा-नितीन रोही,
श्रीगोंदा नगरपालिकेच्या हद्दित मुख्य येणारी औटेवाडी असून येथील महिला दरवर्षी कोणता ना कोणता उपक्रम राबवित असतात.त्यामुळेच या वाडीचे सर्वत्र नाव झलकत असून कौतुक देखील होते. या वाडीतील महिलांनी दरवर्षी प्रमाणे यंदा देखील नागपंचमी सनाचे औचित्य साधुन विविध प्रकारच्या वृक्षांचे
औटेवाडीतील सद्गुरु बाळूमामा तळ मंदिर येथे वृक्षारोपण केले.त्यामध्ये लोकनेते तथा मा नगरसेवक दादासाहेब औटी आणि अनिल औटी,प्रदीप औटी यांचा देखील सिंहाचा वाटा असतो .वृक्षारोपण करते वेळी मा.नगरसेविका सौ.अनिता दादासाहेब औटी,रेखाताई अनिल औटी,प्रियंका प्रदीप औटी,मनीषा
औटी,पाराबाई लबडे,जयश्री औटी,मंदा औटी,वैशाली औटी,
आशाताई शेळके,आक्काबाई शेळके,शांताबाई औटी,सुशीला औटी, मालन औटी यांच्या सह औटेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा