Breaking

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

पिंपळनेर येथील आर्या कॉलेजचा सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकाल*

आर्या रणजीत शिंदे





टेंभुर्णी प्रतिनिधी /अमोल भोसले यास कडून


माढा तालुक्यातील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगा गवव (टें) संचलित, आर्या ज्युनिअर कॉलेज पिंपळनेर या कॉलेजचा पुणे बोर्डाच्या मार्च २०२१ १२ वीच्या विज्ञान शाखेचा निकाल १००टक्के लागला असून सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.

तेजस सूर्यकांत कुलकर्णी


  आर्या रणजित शिंदे हिने ९८.६६ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक तर तेजस सूर्यकांत कुलकर्णी याने ८८.०५ गुण प्राप्त करून व्दितीय तर पल्लवी जितेंद्र पाटील हिने ८७.६६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त करीत उज्जवल यश संपादित केले असून  22 विद्यार्थी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.


पल्लवी जितेंद्र पाटील


या यशाबद्दल मा. आमदार बबनदादा शिंदे ,मा.आमदार संजयमामा शिंदे , जिल्हा परिषद सदस्य मा. रणजितभैय्या शिंदे , सभापती - विक्रमसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराजदादा शिंदे , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रणिता शिंदे ,प्राचार्य- रविंद्र लोखंडे , मुख्याध्यापक- सचिन पवार , अनंतकुमार साठे, राहुल सोमासे , हर्षद शिंदे, स्मिता पाटील , दादासाहेब अधटराव, कुमार बडे, सतिश वरपे , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग ,  सर्व पालकवर्ग यांनी मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा