*जातेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन
*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
जातेगाव ता करमाळा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सरपंच छगन ससाणे,अच्युत कामटे,मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,प्रवीण शिंदे ,युवा नेते नितीन आरणे आदींच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तानाजीराजे शिंदे, अमोल घुमरे,भैरवनाथ चव्हाण, सचिन उबाळे,गौतम ससाणे,कैलास गायकवाड तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
नितीन आरणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा