Breaking

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

विशेष अनुदान योजनेंतुन श्रीगोंदा नगरपरिषदेला ३कोटी रुपये मंजूर-गट नेते-मनोहर पोटे....



विशेष अनुदान योजनेंतुन श्रीगोंदा नगरपरिषदेला ३कोटी रुपये मंजूर-गट नेते-मनोहर पोटे....


श्रीगोंदा:-नितीन रोही

वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत श्रीगोंदा नगरपरिषदेला ३कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विद्यमान गटनेते मनोहर पोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली सदर निधीतून लेंडीनाला शुशोभिकरणसाठी २कोटी १०लाख,छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण ६०लाख रुपये तर महात्मा फुले सर्कल विकसित करण्यासाठी ३०लाख रुपये मंजूर झाले यासाठी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी विशेष लक्ष घातल्याने कोरोना काळात इतरत्र विकास निधीस कात्री लागत असताना श्रीगोंदा नगरपरिषदेला वरील निधी प्राप्त झाला तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते स.म.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे,मा.आमदार राहुलदादा जगताप,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार,जि. प.मा-अध्यक्ष बाबासाहेब भोस,काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक पाटील भोसले,राष्ट्रवादीकॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के यांच्या सहकार्याने आपण श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीत विकास कामांची घोड दौड अविरत सुरू रहावी म्हणून सतत प्रयत्नशील असून राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्यातील मंत्री ना.शंकरराव गडाख,पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,ना.प्राजक्त दादा तनपुरे आदी विकास कामांसाठी श्रीगोंदा नगरपरिषद बाबत पाठपुरावा करताच मदतीची भूमिका घेत असल्याचे सांगून पोटे म्हणाले गेली ५वर्षे सतत विकास कामे सुरू असून श्रीगोंदयाचा चेहरा-मोहरा बदलत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक सुशोभीकरण तसेच हद्दीत रस्ते,आदी कामे सुरू आहेत निवडणूक वेळी आपली विकास कामे पाहून नागरिकांनी पत्नी सौ.शुभांगी पोटे यांना नगराध्यक्षा पदासाठी विजयी केले या काळातही विकासकामे मागील काळातून पुढे सुरू रहावी म्हणून नेते मंडळींच्या सहकार्याने महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा सुरू असून यात यश मिळत असल्याचे पोटे यांनी शेवटी म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा