Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वर्धापन दिन उत्साहात साजरा*



*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वर्धापन दिन उत्साहात साजरा*
तुळजापूर :-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा  वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रोफेसर अनिल शित्रे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी राष्ट्रगीताने आणि विद्यापीठ गीताने ध्वजास मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नरसिंग जाधव कनिष्ठ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक रमेश नन्नवरे,सिनेट सदस्य प्रो. डॉ. गोविंद काळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास राठोड, तसेच सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर प्रा.प्रमोद मुळे, एन. एस. एस. विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ.शशिकला भालकरे ,प्रा. डॉ. सतीश कदम ,प्रा. डॉ. अंबादास बिराजदार , प्राध्यापक डॉ. ज्योतिबा राजकोंडा, प्रो.डॉ.सुरेंद्र मोरे,प्रा. डॉ.मंदार गायकवाड ,उद्धव नन्नवरे प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा