Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

लेंभे डोखे वस्ती येथे घरोघरी शाळा उपक्रमाचे उदघाटन.* *विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.*


*लेंभे डोखे वस्ती येथे घरोघरी शाळा उपक्रमाचे उदघाटन.*


       *विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.*

ऑनलाईन शिक्षणात येणाचा विविध अडचणी व कोरोना महामारी संकटावर व विविध अडचणींवर मात करून शिक्षणासाठी ज्ञानगंगा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत होचण्यासाठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंभे डोखे वस्ती ता. वैजापूर ,जि. औरंगाबाद येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती.शर्मिला अशोक विधाटे मॅडम यांनी इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमाचे उदघाटन वैजापूर तालुक्याचे सन्मानीय गटशिक्षण अधिकारी श्री. मनीष दिवेकर साहेब यांच्या शुभहस्ते तसेच लाडगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय श्री. नामदेव ठाकरे सर, विषयतज्ञ श्री. रमेश बागुल सर, डोणगावच्या सरपंच सौ. स्वाती रवींद्र धोर्डे, श्री. रवींद्र धोर्डे , उपसरपंच सौ. सुनीता युवराज लेंभे,  व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या प्रमुख  उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.
       सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जि. प.प्रथा.शाळा वडगावचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा उपक्रम *श्रीमती. शर्मिला अशोक विधाटे* यांनी लेंभे डोखे वस्ती डोणगाव  मध्ये राबवण्यास सुरुवात केली. १००% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या शाळांपैकी रुद्र गजेंद्र लेंभे इ. ४थी या विद्यार्थ्यांच्या घरी सदर उदघाटन सोहळा पार पडला. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या घरामध्ये विविध तक्ते लावण्याबरोबर यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.  मान्यवरांचे आगमन होताच रुद्र लेंभे या विद्यार्थ्यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले श्री. अमोल गमे सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. श्रीमती. कल्पना खांदे मॅडम मुख्याध्यापक लेंभे डोखे वस्ती शाळा यांनी प्रास्ताविक केले.
        कोरोना संकटामुळे सुमारे दीड वर्षे शाळा बंद असल्याने शाळेपासून दूर असलेल्या चिमुकल्याच्या प्रत्यक्ष घरात शाळा अवतरल्यामुळे रुद्र लेंभे खूष झाला. त्याने मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देवून त्यांची मने जिंकली.
                    याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपक्रमाचे कौतुक केले. सदर उपक्रमाची  माहिती सांगिताना श्रीमती शर्मिला विधाटे म्हणाल्या की, मा. संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या उपक्रमामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणामध्ये आनंददायी पद्धतीने शिक्षण मिळेल.मान्यवरांनी व उपस्थित पालक वर्गाने श्रीमती शर्मिला विधाटे यांचे उपक्रम राबवल्याबद्दल विशेष कौतुक केले व अभिनव उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
     सदर कार्यक्रमास श्री. बि. यु जगताप सर,श्री. अण्णा सोनवणे सर,   श्री. अमोल गमे सर, श्री. अमोल धायतडक सर तसेच पालकही उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा