Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

कॉग्रेसच्या असंघटित कामगार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शारदा भस्मे


कॉग्रेसच्या असंघटित कामगार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शारदा भस्मे 



वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

वडूज ( कर्मवीरनगर ) ता. खटाव येथील समाजसेविका सौ. शारदा संजय भस्मे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय कॉग्रेसच्या असंघटित कामगार महिला आघाडीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून हि नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद बदरूजामा यांनी केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
          सौ.भस्मे यांची असंघटीत कामगार महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेबददल त्यांना खटाव राष्ट्रीय कॉग्रेसचे नेते व विद्यमान नियोजन समिती सदस्य अशोकराव गोडसे आबा, सागरभाऊ सांळुखे, वडूजचे माजी सरपंच अनिल गोडसे सर आदि मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करणात आला. सत्काराला उत्तर देताना सौ.भस्मे म्हणाल्या की, संघटनेने माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती मी व्यवस्थीत पार पाडेन, संघटनेच्या व पदाधिकाऱ्यांच्या  सहकार्याने समाजातील गोरगरीब महिलाकरिता विविध सोयीसुविधा उपलब्ध करणार असून खास करून मजूर महिलांना विशेष प्राधान्य देणार आहे.
         यावेळी येरळा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला, शरद कदम, दत्ता इनामदार, आकाश यादव, नितीन राऊत, वनपाल काश्मिर शिंदे, टिव्ही मालिका सहाय्यक अभिनेत्री जयश्री बिरलींगे, आदिवासी महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा राणी शिंदे, साक्षी साळुंखे, सलमा डांगे, जयश्री मोहिते, योगिता काळे आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जे के काळे यांनी केले तर आभार उमाजी कुकले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा