Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

ब्रह्मकुमारी सेंटर तर्फे आमदार बबनदादा शिंदे यांना रक्षाबंधन .....।।।।



ब्रह्मकुमारी सेंटर तर्फे आमदार बबनदादा शिंदे यांना रक्षाबंधन .....।।।।



 बेंबळे। प्रतिनिधी  / मुकुंद रामदासी                                  

                          प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या टेंभुर्णी सेवा केंद्रातर्फे आमदार बबनदादा शिंदे यांच्या निमगाव येथील निवासी रक्षाबंधन साजरे करण्यात आले. ब्रह्माकुमारी अनिता बेहेनजी व ब्रह्माकुमारी हेमलता पावले यांनी आमदार बबनदादा शिंदे, सौ सुनंदाताई शिंदे व त्यांचे सुपुत्र रणजीतभैया शिंदे यांना राख्या बांधल्या
              


  प्रजापिता ब्रह्माकुमारी टेंभुर्णी सेवा केंद्रामार्फत प्रत्येक वर्षी रक्षाबंधन उत्सव अतिशय आनंदी , उत्साही व एकत्रित वातावरणात साजरा केला जातो व आमदार बबनदादा शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनंदाताई शिंदे मागील अनेक वर्षापासून आवर्जून उपस्थित असतात व ते सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित करतात, परंतु कोरोना महामारी मुळे मागील दीड वर्षापासून कोणताही उत्सव साजरा केला जात नाही.



 यावर्षी मात्र सध्या थोडी मोकळीक असल्यामुळे ,कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून, ब्रह्माकुमारी अनिता बेहेन, ब्रह्माकुमारी हेमलता पावले, डॉ. ए एस पावले व ब्रह्माकुमार सुभाष भाई यांनी आमदार शिंदे यांच्या निमगाव येथील निवासस्थानी जाऊन आदरणीय दादा, सौ. वहिनी व त्यांचे सुपुत्र रंणजीत भैय्या यांना राख्या बांधल्या. याठिकाणी रक्षाबंधनाचे अध्यात्मिक रहस्य व शिव परमात्म्याचा दिव्य संदेश याविषयी ब्रह्माकुमारी अनिता बहेनजी यांनी  उपदेशात्मक चर्चा केली व नंतर मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, देशातून कोरोना महामारी चे संकट लवकरात लवकर दूर होवो व राज्यातील प्रत्येक ब्रह्माकुमारी सेंटरवरती पूर्वीप्रमाणेच एकत्रितपणे, मनमोकळ्या वातावरणात, आनंदाने व उत्साहाने सर्व कार्यक्रम सुरू व्हावेत हीच" शिवपरमात्मा"  चरणी प्रार्थना.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा