Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

खोरोची येथे शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागल्याने संसार उद्धवस्त ;-तीन लाखांचे नुकसान...*


*खोरोची येथे शॉर्ट सर्किट मुळे  घराला आग लागल्याने संसार उद्धवस्त ;-तीन लाखांचे नुकसान...*



प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के

दि.16- रात्री 12.00च्या सुमारास खोरोची गावातील शंकर बाबू नगरे यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. आगीमध्ये घरातील सर्व सांसारिक साहित्य जळून खाक झाले. सुदयवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शंकर बाबू नगरे हे मासे-मारी करून स्वतःचा संसार चालवतात, त्यांना 2 मुले असून ते दोघेही मासे-मारी साठी उजनीला असतात,  रात्री शंकर नगरे व त्यांची पत्नी आपल्या 2 पुतन्यांसह सोप्यामध्ये झोपले होते, 

 गाढ झोपेमुळे रात्री शॉर्ट सर्किट झालेले कोणाच्याच लक्षात आले नाही, पण जेव्हा घरातून कशाचा तरी बार झाल्या नंतर शंकर बाबू नगरे यांना जाग आली, बायकोला व 2 पुत्यांना बाहेर घेऊन जाऊन शेजारच्याकडे धाव घेतली, बघता बघता 20-30 लोक जमा झाले. लाईट चालू असल्यामुळे प्रथम वायरमन ला फोन करून लाईट बंद केली. त्यानंतर सर्वांनी पाण्याचा मारा करून तब्बल अर्ध्या तासाने आग आटोक्यात आणली, तो पर्यंत खूप उशीर झाला होता घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं होत. यामध्ये शेतातील धान्य, साखरेचे पोते, युरिया, 2 कपाटे, कपडे, रोख रक्कम, टीव्ही, डीव्हीडी, डिश, डाग दागिने, लाईट फिटिंग, बेड, भांडी, मासे-मारीची जाळी, फॅन इ. वस्तू जळून खाक झाले आहे. तब्बल यामध्ये 3 ते 3.50 लाखाचे नुकसान झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा