Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

अवैध वाळू उपस्यावर अप्पर तहसीलदार पवार यांची कारवाई....


अवैध वाळू उपस्यावर अप्पर तहसीलदार पवार यांची कारवाई....


श्रीगोंदा-नितीन रोही 

तालुक्यातील पेडगाव येथे भीमा नदी पात्रात  अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्या पथकाने छापा टाकून तीन वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक ताब्यात घेतल्या आहेत.
   याबाबत सविस्तर माहिती अशी की  गुप्त खबऱ्याने दि.१६ रोजी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना माहिती दिली की पेडगाव येथील भीमा पात्रात  यंत्राच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू काढुन अवैध वाळू वाहतूक सुरू आहे.  तातडीने पवार यांनी भरारी पथक नेमून पेडगाव येथे छापा टाकला असता ३ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक ताब्यात घेतल्या आहेत. ही वाहने पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावली आहेत. वाळू तस्करांनी एक वाहन चिखलात फसवले होते परंतु चारुशीला पवार यांच्या पथकाने रात्री १ वाजेपर्यंत अथक प्रयत्न करून तो ट्रक बाहेर काढला. ही कामगिरी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, महसूल सहाय्यक सतीश घोडेकर, मंडळ अधिकारी,तलाठी मापारी, मोरे,  शिपाई स्वप्नील सुद्रीक, चालक विशाल, अरुण व पोलीस कर्मचारी राजू भोर व गोरे यांचा समावेश होता. 

चौकट : घोड-भीमा नदी पात्रातील वाळू चोरीवर महसूल विभागाचे लक्ष राहणार आहे. अवैध वाळू चोरी निदर्शनास आल्यावर नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करवा. असे अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा