Breaking

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

द रॅायल प्रेझेंटच्या सोलापूर ब्रॅंड ॲम्बेसिडर पदी सिमा रजपूत सन्मानित



द रॅायल प्रेझेंटच्या सोलापूर ब्रॅंड ॲम्बेसिडर पदी सिमा रजपूत सन्मानित 




कुर्डूवाडी प्रतिनिधी /कोरे यास कडून


द रॉयल प्रेझेंट च्या वतीने घेण्यात आलेला भव्य-दिव्य मॉडेलिंग शो *द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021* हा शो  पुणे मध्ये क्लब जे.2.के मध्ये मोठ्या उस्ताहात संपन्न झाला. हा शो तब्बल 20 महिन्यानंतर  पुणे मध्ये 20 ऑगस्ट ला भरविण्यात आला या शो मध्ये सोलापुर ब्रँड अम्बेसिडर म्हणून महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी विजेत्या कुर्डूवाडीच्या सिमा आशिष रजपूत यांना गौरविण्यात आले 


रॉयल च्या शो ची सर्वाना उस्तुकता लागून होती.शेवटी हा शो भव्य दिव्य असाच संपन्न झाला. *मिस्टर.मिस.मिसेस* असे या शो चे स्वरुप होते.या शो मध्ये अंतिम फेरीत महाराष्ट्रातील ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. देवमाणूस फेम लाला डॉ.शशिकांत डोईफोडे आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले ,मिसेस महाराष्ट्र स्नेहल जितूरी,आयोजक व निर्माता नितीन झगरे यांच्या हस्ते सिमा आशिष रजपूत यांना गौरविण्यात आले त्याच बरोबर ब्रँड अम्बेसिडर नांदेड ऐश्वर्या कुंटे, ब्रँड अम्बेसिडर ठाणे प्राची जितेन्द्र,,ब्रँड अम्बेसिडर बंगलोर निशा शिंदे ,ब्रँड अम्बेसिडर दिल्ली सरोज गजभिये,ब्रँड अम्बेसिडर मुंबई अनघा गावडे,ब्रँड अम्बेसिडर कोल्हापुर स्नेहल सरगर,ब्रँड अम्बेसिडर मुंबई रोशनी कदम,ब्रँड अम्बेसिडर पुणे सुरेखा भोसले,ब्रँड अम्बेसिडर नाशिक तृप्ती ढवन आदिंना गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी ओ शेठ तुम्ही नाद केला थेट या लोकप्रिय गिताचे गायक उमेश गवळी रमेश परळीकर व टिम उपस्थित होती.






सौ सिमा आशिष रजपूत यांच्या या यशा बद्दल माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे तसेच इनरव्हिल क्लब कुर्डूवाडीच्या पदाधिकार-यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा