Breaking

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

*एक हात मदतीचा' या उपक्रमा अंतर्गत तुळजापूर येथील जिजामाता प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री.मधुकर शेळके यांची सुकन्या कु.श्रद्धा मधुकर शेळके हिने रोख रक्कम 5000/- हजार रुपये भेट दिली*



*एक हात मदतीचा' या उपक्रमा अंतर्गत तुळजापूर येथील जिजामाता प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री.मधुकर शेळके यांची सुकन्या कु.श्रद्धा मधुकर शेळके हिने रोख रक्कम 5000/- हजार रुपये भेट दिली*

तुळजापूर येथील कुमारी.प्रतिक्षा अमर बनसोडे हि अवघ्या 6 महिन्याची असल्यापासून तिला मेजर थॅलेसिमिया आहे, म्हणजे तिला दर दोन आठवड्यातून ब्लड ट्रान्समिशन करावे लागते. डॉक्टरांनी तिला बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावयाचा सल्ला दिला आहे. या साठीचा खर्च तब्बल 14 ते 15 लाख रुपये सांगितला आहे, त्या अनुसंगाने तिला आर्थिक मदत करण्यासाठी इयत्ता सहावीत शिकणारी मुलगी श्रद्धा मधुकर शेळके या मुलीने आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे एकत्र करून, कुमारी प्रतीक्षा अमर बनसोडे, हिला पाच हजार रुपयांची मदत केली आहे, श्रद्धा शेळके हिने कोरोना महामारीत 101 गोरगरिबांना किराणा कीटचे वाटप केले होते,या तिच्या कार्याने संपूर्ण तुळजापूर शहरभर श्रद्धाचे कौतुक होत आहे.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा