*प्रथम वर्ष डी फार्मसी च्या प्रवेशासाठी प्रथम फेरी दिनांक 20 सप्टेंबर पासून सुरू*
मौजे अकोले खुर्द.ता.माढा शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रथम वर्ष डी फार्मसीसाठी प्रवेश प्रक्रियेची प्रथम फेरी सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार असून ती बुधवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये ऑनलाईन कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे तसेच डी फार्मसी प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती श्री गणपती फार्मसी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी.बेंदगुडे यांनी दिली. 2021-22 च्या पदविका फार्मसी अर्थात डी फार्मसी प्रवेशाकरिता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्वीकारून कागदपत्रांची तपासणी,पडताळणी करणे सर्व प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता येत्या सोमवारी दिनांक 20 सप्टेंबरपासून ते बुधवार दिनांक 24 सप्टेंबर पर्यंत उमेदवाराला योग्य महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीचा लाभ घेता येणार आहे. पहिल्या फेरीसाठी जागा वाटप शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केले जाईल. या पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती शनिवार दिनांक 25 सप्टेंबर ते सोमवार दिनांक 27 सप्टेंबर या दरम्यान करता येईल व त्यानंतर जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून प्रवेशाची निश्चीती करण्याची मुदत शनिवार दिनांक 25 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा