*महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी येथे शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न.*
******************************
*उच्च प्राथमिक विभागाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक श्री.शोएब बागवान सर तर उपाध्यक्षपदी श्री.शांतीलाल (आण्णा) बागवाले यांची निवड*
*******************************************
**** उपाध्यक्ष****************
उपाध्यक्ष
*******************************************
टेंभुर्णी प्रतिनिधी / महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी येथील शाळेत पालकांची सहविचार सभा आयोजित केली होती. यावेळी शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थित पालकांमधून निवड करण्यात आली. माध्यमिक विभागाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक श्री.विजय यादव सर आणि उपाध्यक्षपदी श्री.संजय दत्तात्रय कुटे यांची निवड करण्यात आली. तसेच उच्च प्राथमिक विभागाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक श्री.शोएब बागवान सर आणि उपाध्यक्षपदी श्री.शांतीलाल (आण्णा) गोविंद बागवाले यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.नारायण भानवसे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शोएब बागवान सर यांनी कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीचे नियोजन पालकांना सांगितले. तसेच शाळेच्या सोयी सुविधा बाबत पालकांना माहिती दिली. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या व शाळेच्या अनेक समस्या विषयी चर्चा करण्यात आली. बर्याच पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व पालकांनी शाळेला सहकार्य करण्याची हमी दिली. ऑनलाइन अभ्यासाची सुविधा घरी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्याची पालकांची आग्रही मागणी मान्य करण्यात आली. शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमांविषयी पालकांनी कौतुक केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गगन गोडसे सर यांनी केले व प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.शरद सातव सर यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा