*तुळजापूर तहसिल कडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते धनादेशचे वाटप*
तुळजापूर तालुक्यातील ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मयत झाले आहे.अशा पात्र लाभार्थ्यांना तुळजापूर तहसिल कडून ७३ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत प्रत्येकी रुपये - २००००/-चे धनादेश वाटप करण्यात आले.त्यामध्ये प्रतिभा पवार, (तुळजापूर)मुक्ताबाई शिंदे,(सावरगाव),मंगल कोरे, (चिवरी),रेखा भालेकर, (बसवंतवाडी), आरीफा जमादार,(जळकोट),ज्योती चव्हाण,(तुळजापूर), कलीमून शेख, (नळदुर्ग),
लक्ष्मी जानराव,(बोरी),कौसर मौजान,(नळदुर्ग) माधुरी
भोसले, (गंधोरा) शिला वाघमारे,(तीर्थ बु) सिंधूबाई
मिसाळ,(बिजनवाडी) यांचा समावेश आहे.यावेळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते,सर्व नायब तहसीलदार,कार्यालयीन कर्मचारी
मंडळ अधिकारी, गावकामगार तलाठी तसेच लाभधारक उपस्थीत होते. तालुक्यातील अशा प्रकारच्या लाभापासून एखादे कुटुंब वंचित असल्यास त्यांनी सर्व कागदपत्रासह तहसील कार्यालय तुळजापूर येथे अर्ज करण्याचे आवाहन तहसीलच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा