*तुळजापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*.
दिनांक १६ सप्टेंबर २०२१, रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली, यावेळी तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगरपरिषद शाळा क्रमांक १ ते घोलकर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नियोजित जागी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती मधून स्मारक करणे, भवानी रोड आशीर्वाद लॉज जवळून भवानी कुंडास कायमचा रस्ता करणे जिल्हा वार्षिक योजना,(अजाघका) माननीय स्थानिक आमदार निधी, महाराष्ट्र नागरी दलित्तेतर / वैशिष्ट्यपूर्ण निधी इत्यादी मधून विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत, इदगाह मैदान येथे कॉन्क्रीट नाली करणे, मंजुरी इत्यादी नियोजित विकास कामांना मंजुरी देण्यात आली, पूर्वीपासून तुळजापूर शहरातील वस्त्या व रस्त्यांना जातीवाचक नावे देण्यात आलेली होती,ही नावे बदलून वस्ती व रस्त्याना महापुरुषांची नावे देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, तुळजापूर शहरामध्ये राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे राष्ट्रमाता जिजामाता यांच पुतळा बसविण्यास मान्यता देण्यात आली, सर्वे नंबर २१५ वेताळनगर येथे संत सेना महाराज समाज मंदिर बांधण्यास मान्यता देण्यात आली, स्वच्छ माझे कार्यालय अंतर्गत ऐतिहासिक सूशोभीकरण करण्यास शासनाच्या योजनेमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली, तसेच शहरातील नगरपरिषदेच्या सर्व शाळा आदर्श मॉडेल करण्यास मान्यता देण्यात आली,सभेस यावेळी श्री किशोर साठे,राजेंद्र कंदले, सौ हेमा कदम, सौ देशमाने मंजुषा, विविध समित्याचे सभापती व उपसभापती, श्री जगदाळे पंडित, सौ वैशाली कदम, सौ शारदा भोसले, श्रीमती भारती ताई गवळी, सौ अश्विनी रोचकरी, इत्यादी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा