Breaking

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

पर्यावरणपूरक सीएनजी गॅस शहरात‌ सुरु,गॅस वाहनधारकांना मिळाला दिलासा.



पर्यावरणपूरक सीएनजी गॅस शहरात‌ सुरु,
गॅस वाहनधारकांना मिळाला दिलासा.



उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. तर पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून प्रचंड प्रमाणात धूर निघून वातावरण दूषित होऊ लागल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊ लागला आहे. दूषित पर्यावरणामुळे मानवी अर्थात सजीव सृष्टीच्या अस्तित्वालाच प्रचंड धोका निर्माण झाला आहे. तो टाळण्यासाठी  नैसर्गिक गॅस अर्थात सीएनजी गॅस पंपाचा पर्यायी मार्ग निवडण्यात आला आहे. तो सीएनजी गॅस पंप उस्मानाबाद शहरात सुरु झाला असल्यामुळे गॅसवर चालणाऱ्या वाहनधारकांना सोय उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना दिलासा देखील मिळू लागला आहे.

उस्मानाबाद शहरातील सांजा रस्त्यालगत असलेल्या रवि शेरखाने यांनी राजलक्ष्मी सीएनजी गॅस पंप ग्राहकांच्या सेवेसाठी दि. १५ ऑगस्टपासून अत्याधुनिक यंत्रणेसह सुरु केला आहे. त्यामुळे दररोज डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या दराला कंटाळलेल्या वाहनधारकांना या पंपामुळे मोठा दिलासा मिळू लागला आहे. तर ग्राहकांना आधुनिक व अत्यावश्यक सेवा देत असलेल्या गॅस पंपावर वाहन चालक गॅस भरण्यासाठी सोलापूरसह इतर विविध भागातून येत असल्यामुळे गर्दी होऊ लागली आहे.
पर्यावरणामध्ये प्रदूषणाची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय व आद्य कर्तव्य समजून वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जर आपण पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करीत असाल तर त्यात आणखीनच भर पडत आहे. त्याऐवजी सीएनजी कार व इतर वाहनांचा वापर करण्यावर भर देणे आवश्यक व काळाची गरज निर्माण झाली आहे.

चौकट

 आपण सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनाचा वापर केला तर आपणास मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होते. विशेष म्हणजे त्या पैशांमध्ये आपण जास्तीच्या अंतराचा प्रवास देखील करु शकतो. सीएनजीपासून कार्बन डायऑक्‍साईड (सीओ - २) आणि पाण्याचे बाष्प तयार होते. त्यामुळे सीएनजी हानिकारक कार्बन मोनॉक्साईड (सीओ) चे उत्सर्जन फार थोड्या प्रमाणात होते. तर नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जन देखील अत्यल्प होते. सीएनजी गॅस भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध उपलब्ध असून असे सांगितले जाते  की, भारत हा नैसर्गिक गॅसचे माहेरघर आहे.

चौकट

भारतात एकाहून अनेक कंपन्या चांगल्या पद्धतीच्या सीएनजी कार उपलब्ध करून देत आहेत. त्यामध्ये भारतीय बाजारात मारुती सुझुकी अॉल्टो कार, हुंडाई सेंट्रो, मारुती सुझुकी सेलेरियो, मारुती सुझुकी इको, हुंडाई ग्रँड आई, मारुती सुझुकी वॅगनार, मारुती सुझुकी अर्टिगा आणि फोर्ड एक्सपायर सारख्या सीएनजी कार उपलब्ध आहेत.


चौकट

वाहनांमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आल्यानंतर सर्वप्रथम त्या वाहनातील सर्व प्रवाशांना खाली उतरवले जाते. तसेच गॅस भरतेवेळी त्या वाहन चालका जवळील मोबाईल सुरू नसला पाहिजे जर सुरू असेल तर तो बंद करण्यास सांगितले जाते. तर गॅस टाकीत भरताना २०० दाबाने (प्रेशरने) भरला जात असल्यामुळे पूर्वी उच्च दाबाने भरला जात असलेल्या गॅसची दबाव क्षमता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे या माध्यमातून प्रवाशांसह सर्वांच्याच सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.  

चौकट

सीएनजी वाहनांची बुकिंग वेटिंगवर !

सीएनजी वाहन वापरण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. मागणीच्या प्रमाणात वाहने उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांनी सीएनजी वाहन खरेदीसाठी बुकिंग केली असली तरी त्यांना वाटच पहावी लागणार आहे.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा