Breaking

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

दहिवलीची ‌केळी इराण वारीला...



दहिवलीची ‌केळी इराण वारीला...




कनेरगाव प्रतिनिधी/ अतुल डोके

दहिवली- दहिवली येथील युवा शेतकरी राहूल पाटील यांची केळी थेट इराण वारीला गेली आहे. आधुनिक शेतीची कास धरत राहुल पाटील यांनी शेतीकडे लक्ष देत केळी हे पीक आपल्या शेतात घेतले. योग्य शेताची मशागत आणि योग्य मार्गदर्शन याबळावर केळीचे साडेतीन एकरात पीक घेऊन त्यांनी सोळा लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले. शेतकऱ्यांना आदर्श वाटावा‌ अशीच पाटील यांनी शेती केली आहे.
       पाटील यांनी G9 या जातीच्या रोपांची निवड केली. सुरुवातीपासूनच या रोपांची योग्य निगा राखली. विद्राव्य खतासोबतच, फवारणीवर भर दिला. या केळीच्या लागवडी आधी 20 टन‌ शेणखत जमिनीत मिसळून जमिन लागवडी योग्य केली. पाटील यांचे म्हणणे आहे, केळी ‌लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेणखत वरदान ठरत आहे, या खतांमुळे पिकांची गुणवत्ता सोबतच उत्पादन ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केळीची सुरुवातीपासूनच योग्य सांभाळणी केली तर त्यांचा फायदा नक्कीच होता.‌ केळीवर येणाऱ्या करपा आणि व्हायरस या रोगाची आपण काळजी घ्यावी लागते, यासाठी योग्य वेळी फवारणी करावी लागते. खतासोबतच पाण्याचे प्रमाण ही चांगले ठेवावे लागते. शेतामध्ये तणांचे प्रमाण होऊ न देता स्वच्छ जमिन ठेवावी, यामुळे केळीवर मच्छर येत नाहीत. निर्यातक्षम केळी करण्यास याचा फायदा होत आहे.
        पाटील यांनी आपली केळी इराण जात असल्यामुळे आपण केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे म्हटले आहे. सोबतच केळी थेट निर्यात झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा चांगला दर मिळाला आहे. जिद्द आणि मेहनती शेतकरी राहुल पाटील यांची यशोगाथा ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील ‌चौथ्या वर्षातील विद्यार्थी विशाल खोचरे यांनी घेतली. यावेळी विशाल खोचरे यांना‌ डॉ साळवे आणि डॉ. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कोट
        तरुणांनी नोकरीच्या मागे न‌ लागता आधुनिक शेतीची कास पकडवी. पारंपरिक पिके न‌‌ घेता बाजारपेठेचा अंदाज घेत योग्य पिकांची लागवड करावी. आपण स्वतः देशी‌ वाण असलेली महाराष्ट्र शासन मान्यता असलेली G9 या केळीच्या रोपांची निवड केली. याचा फायदा मला नक्कीच उत्पादनात झाला. शेतात योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळेच आपण यशस्वी ठरत या केळीची इराण वारी करण्यासाठी यशस्वी झालो... राहुल पाटील, दहिवली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा