Breaking

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेतली श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांची सांत्वनपर भेट...


खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेतली श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांची सांत्वनपर भेट...


*AJ 24 Taas News/शरीफ काझी

फलटण (प्रतिनिधी) : दि.०३ सप्टेंबर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर (बाईसाहेब महाराज) यांचे मंगळवार दि.२७ जुलै २०२१ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. या निमित्ताने माजी केंद्रीय कृषिमंत्री व विद्यमान खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथील ‘‘सरोज व्हीला‘‘ या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी आलेले होते.


या वेळी विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर, बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव (बापू) व उद्योजिका प्रिती प्रभाकर घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा