Breaking

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर येथील आय,सी,आय,सी,आय, बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटक, तब्बल ४ लाख ५६ हजार ६१६ रुपये हस्तगत.*



*तुळजापूर येथील आय,सी,आय,सी,आय, बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटक, तब्बल ४ लाख ५६ हजार ६१६ रुपये हस्तगत.*




तुळजापूर येथील आय,सी, आय ,सी, आय, बँकेमध्ये ६३ तोळे बनावट सोने तारण ठेवून पैसे उचलून बँकेची १७,७०,८५१  रुपयांची फसवणूक केल्याने आरोपीविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे शाखा अधिकारी श्री सुनील क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गुरंन २९०-२१, कलम ४२०,५११, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, श्री राज तिलक रोशन पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, अप्पर पोलीस अधीक्षक  श्री संदीप पालवे ,श्रीमती अंजूम शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग तुळजापूर ,व श्री आजिनाथ काशीद, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तुळजापूर, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर कांबळे, व त्यांचे पथक पोहेकॉ सोनवणे,पोना यादव, पोकॉ सावरे, साळुंके, ससाणे, पवार यांचे पथकाने आरोपी सद्दाम शेख यास मोहोळ येथून दिनांक, ०७ /०९/२०२१, रोजी अटक केली, तसेच आरोपीची इतर साथीदार रशीद अलाउद्दीन नदाफ, रा, आरबळी तालुका तुळजापूर, कोंडाजी हारून खुदादे, रा, इटकळ तालुका तुळजापूर यांना दिनांक ११/०९/२०२१, रोजी अटक करण्यात आली आहे, आरोपी अब्बास राजू पठाण, रा, इटकळ गल्ली ता, तुळजापूर यास दिनांक १४/०९/२०२१,रोजी इटकळ ता, तुळजापूर येथून अटक करण्यात आली, सदर आरोपी कडून बनावट सोन्यासह १ लाख ३५ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले आहे, तसेच आरोपी यांनी  बँकेत ३ लाख २१ हजार ५१६, रुपये भरणा करण्यात आले असून, असे एकूण ४ लाख ५६ हजार ६१६ रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.



प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा