*तुळजापूर येथे चंद्रकांत बापू कणे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नगर परिषद तुळजापूर यांच्या वतीने कोव्हिशिल्ड लसीकरण घेण्यात आले,विक्रमी 330 लसीकरण झाले*
आज दिनांक ,14 सप्टेंबर 2021, रोजी ,श्री चंद्रकांत बापूसाहेब आनंदराव कणे,माजी नगराध्यक्ष. तथा नगरसेवक नगर परिषद तुळजापूर यांच्या विशेष प्रयत्नातून तुळजापूर येथील लमाण तांडा अपसिंगा रोड सारख्या अति कमी प्रमाणात लसीकरण झालेल्या भागात लसीकरण घेण्यात आले होते,तसेच बापूसाहेब कणे मित्र मंडळाच्या वतीने
घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन, मोफत रिक्षा व चहा नाष्टा पाण्याची सोय करण्यात आली होती,या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्यामुळे विक्रमी 330 लोकांचे लसीकरण झाले
संयोजक बापुसाहेब कणे मित्र परिवार, तुळजापूर यांचे सहकार्य लाभले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा