Breaking

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते सुगाव खुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजनआमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण




रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते सुगाव खुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

********************



आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

माढा / प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील सुगाव खुर्द येथे  आमदार बबनरावजी शिंदे यांचे आमदार निधीतून दिलेल्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन व शासनाच्या पंचवीस-पंधरा च्या निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून 7 लाख रुपये रकमेतून
सभामंडप उभारण्यात येणार असून  पंचवीस-पंधरा योजनेच्या 10 लाख रुपये रकमेतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत अशा एकूण 17 लाख रुपये रकमेतून होणा-या विविध विकासकामांचे कामाचे भूमिपूजन केले.आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की, या भागातील शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न व समस्या आमदार बबनदादा शिंदे यांनी सोडविण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. भविष्यातही आम्ही या भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी सुगाव खुर्द येथील ऋषिकेश देवकर याचा कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, उपअभियंता कांबळे साहेब,शाखा अभियंता कपिले साहेब,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण ढवळे, सरपंच अंबादास गोफणे,उपसरपंच विनायक देवकर,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बेलकर,रसुल काझी,शिवाजी लांडगे, हेमंत देवकर,महेंद्र देवकर, रामभाऊ देवकर,अशोक देवकर, देविदास तावरे,अस्लम काझी, बलभीम काटे,सागर पवार,ज्ञानेश्वर देवकर,तानाजी लांडगे,सागर देवकर, शत्रुघ्न देवकर,ज्ञानेश्वर सुर्वे,अशोक देवकर,गणेश लांडगे,दत्तात्रय सरडे, पोपट आडेकर,नौशाद काझी,आण्णा देवकर,गोपाळ लांडगे,ग्रामपंचायत कर्मचारी देविदास गोफणे यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी- सुगाव खुर्द ता.पंढरपूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे बाजूला इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा