उपळाई खुर्दचे धनाजी राऊत यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील उपळाई खुर्दचे रहिवासी व सध्या बार्शी येथील सुलाखे हायस्कूलमधील इंग्रजी विषयाचे सहशिक्षक धनाजी नारायण राऊत यांना सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा सन 2021 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
धनाजी राऊत यांनी 21 वर्षाच्या सेवेत इंग्रजी विषयाचे उत्कृष्टरित्या अध्यापनाचे कार्य केले आहे.त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत, कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांनी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अध्यापन व प्रभावीपणे स्वाध्याय उपक्रम राबविला आहे. इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी जिल्हा,विभागीय व राज्य स्तरावर काम केले आहे.अनेक राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविला आहे.शाळेतील शालेय व सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.यापूर्वीही त्यांना तालुका व जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
याबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे,सचिव आनंद कवठाळे,मुख्याध्यापक अण्णासाहेब पाटकुलकर,उपमुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर,पर्यवेक्षक अनिल जोशी,सरपंच संदीप पाटील, भाऊसाहेब पाटील, रत्नदिप मस्के, पत्रकार किरण चव्हाण,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,तानाजी राऊत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बार्शी इंग्लिश टीचर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा